OLA कंपनी १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार ?

0
365

देश , दि. १ (पीसीबी) – कॅब सर्व्हिस देणारी ओला कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे इलेक्ट्रिक उत्पादन व्यवसायासाठी ओला भरती करत आहे तर दुसरीकडे जवळपास १ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ६ जुलैपासून कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यांकन करण्यास सुरुवात केली आहे. साधारण ४००-५०० कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते असं सांगितले होते परंतु सूत्रांनुसार ही संख्या १ हजारांपर्यंत वाढू शकते.

ही प्रक्रिया काही आठवडे सुरू राहील. कंपनीने इलेक्ट्रिक मोबिलिटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्याठिकाणी ते कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत. ज्यांची कामगिरी खराब राहिली आहे अशा कर्मचाऱ्यांना कंपनीने स्वच्छेने राजीनामा देण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना वर्षाच्या कामावरून दिले जाणारे अपरायझल देखील यंदा टाळले आहे. म्हणजेच जे कर्मचारी नोकरीवर ठेवायचे आहेत, त्यांना यंदा पगारवाढ मिळणार नाही. एवढेच नाही तर ओलाने युज्ड कार सेल सह अन्य कंपन्याही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओलाने आपले लक्ष इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटवर देण्याचे ठरविले आहे. यामुळे कंपनीने अन्य उद्योग बंद केले आहेत. गेल्याच महिन्यात कंपनीने युज्ड कारचा उद्योग बंद केला होता. महत्वाचे म्हणजे देशभरातील १०० शहरांत ३०० सेंटर खोलणार होती. याद्वारे १० हजार नोकऱ्या उपलब्ध करणार होती. याचबरोबर क्विक कॉमर्स बिझनेस Ola Dash देखील बंद करणार आहे. २०१५ मध्ये Ola Cafes वर्षभरात बंद केले होते. यानंतर कंपनीने ओला फूड्स देखील सुरु केले होते, परंतू ते देखील म्हणावा तसा वेग पकडू शकला नाही.

कंपनीने १८ जुलै रोजी सांगितले की, ते बेंगळुरूमधील आगामी सेल बॅटरी सेल संशोधन आणि विकास सुविधेत सुमारे ५० कोटी डॉलर गुंतवणूक करत आहे, जे ऑगस्टमध्ये काम करण्यास सुरुवात करेल आणि ५०० ​​हून अधिक अभियंते आणि पीएचडी धारकांना रोजगार देईल. २१७० नावाचा भारतातील पहिला स्वदेशी विकसित लिथियम-आयन बॅटरी सेल विकसित केला आहे. त्यांनी बॅटरी तयार करण्यासाठी सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाशी १८ हजार कोटींचा करार केला आहे.