पतीला बेदम मारहाण पत्नीसह पाच जणांवर गुन्हा

0
630

पिंपरी, दि. 26 (पीसीबी) – पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी पतीला बेदम मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासूला देखील मारहाण करून शिवीगाळ केली. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री कृष्णानगर दिघी येथे घडली.

अभिजित बाबू शेळके (वय 34, रा. कृष्णानगर, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांची पत्नी, प्रणव पांडुरंग झोरे, श्री आखाडे आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीने फिर्यादी विरोधात घरगुती हिंसाचाराचा दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. माझी मुलगी माझ्या ताब्यात द्या, असे फिर्यादींनी म्हटले असता आरोपींनी त्यांना मारहाण केली. दोन महिलांनी फिर्यादींना चावा घेऊन नखाने ओरखडून जखमी केले. डोक्यात दगड मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आईला आरोपींनी हाताने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.