“फिक्स मॅच मी बघत नाही. मी लाईव्ह मॅच बघत असतो…

0
368

ठाकरे यांच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय. या मुलाखतीवरुन अनेक नेते ठाकरेंवर टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या मुलाखतीवर प्रतिक्रिया देणं टाळलंय. काय म्हणालेत ते…जाणून घ्या!

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांना उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. ते म्हणाले, “फिक्स मॅच मी बघत नाही. मी लाईव्ह मॅच बघत असतो. जेव्हा पुढे काही होईल तेव्हा मी त्यावर प्रतिक्रिया देईन.”दरम्यान, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत भाजपा तसंच बंडखोर आमदारांवर सडेतोड टीका केली आहे. सडलेला पालापाचोळा आहे, जो आत्ता पडतोय, तो एकदा शांत झाला की सगळं सत्य समोर येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर भाजपा आमदार आशिष शेलारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्र्यांना पालापाचोळा म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.