`मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले, आपल्याला दुःख झालं. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो

0
255

– चंद्रकांत पाटील यांच्या त्या भाषणामुळे राजकारणात खळबळ

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : चंद्रकांत पाटील यांनी छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. नेटकऱ्यांच्या टीकेनंतर भाजपने खबरदारी घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे ते भाषण आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवलं आहे.

“केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. आपल्याला दुःख झालं. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पनवेलच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटले होते. नेटकऱ्यांनी त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने पाटलांचं भाषण हटवलं आहे.

या प्रकरणानंतर भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे भाषण काढून टाकण्यात आलं आहे. फेसबुक, ट्वीटर आणि युट्यूबवरून ते भाषण काढून टाकण्यात आलं असून चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आणि उघड उघड व्यक्त केलेल्या नाराजीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याची खंत भाजप नेत्यांमध्ये आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चांना ब्रेक लागावा यासाठी भाजपने हे पाऊल उचलले आहे.

जेव्हा पासून शपथ घेतली तेव्हा सर्व मुंबईत आहेत त्यामुळे आता चला आपल्या घरी कामाला लागू जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत. नगरपालिका, पालिका निवडणुक लागली आहे. आपल्या मुंबई महापालिका जिंकायची आहे. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. नेत्यांनी आदेश करायचा नसतो इच्छा व्यक्त करायची असते आणि आपण त्याच पालन करायचं असतं, असं आवाहनही यावेळी पाटलांनी केलं होतं.