प्लास्टिक वापरणा-या आस्थापनांवर ग्रीन मार्शल पथकाची थडक कारवाई

0
362

– प्लास्टिक वापरणा-या आस्थापनांवर ग्रीन मार्शल पथकाने थडक कारवाई करण्यात येत आहे.

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) –  बंदी असलेले प्लास्टिक वापरणा-या आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी ग्रीन मार्शल पथकांना आदेश दिले होते. त्या अनुंषगाने ग्रीन मार्शल पथकाने 20 जुलै रोजी दवाबाजार चिंचवड येथील सात अस्थापनावर बंदी असलेले प्लास्टिक वापरल्या प्रकरणी कारवाई केली. त्यांच्याकडून 40 हजार रुपये दंड वसूल केला.  संबंधितांकडून 20 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

21 जुलै रोजी पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेत दैलत ट्रेडर्स या आस्थापनेवर कारवाई करून 150 किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त केले. दंडात्मक कारवाई  केली. 22 जुलै रोजी बाणेर येथील नामांकीत हॉस्पीटलने पिंपरी डेअरी फ्रार्म रसत्यावर त्यांचे बायोमेडिकल वेस्ट टाकल्याचे निदर्शनास आले.  त्याबाबत संबंधितावर 35 हजार रुपये दंडात्मक कारवाई केली.  शाहूनगर, चिंचवड येथील नामांकीत हॉस्पीटलने आपला बायोमेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकला. त्याप्रकरणी संबंधितांवर 35 हजार दंडात्मक कारवाई केली. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी / अंमलदार , महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) जवान यांचा समावेश असलेल्या ग्रीन मार्शल पथकाकडून या कारवाया करण्यात आल्या.