दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारा माहिती अधिकार कार्यकर्ता गजाआड

0
208

पुणे, दि. २० (पीसीबी) – अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आढळगाव येथे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करतांना शासकीय परवानग्या घेतल्या नसल्याची भिती दाखवुन, महामार्गाच्या कत्रांटदाराकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील स्वंयमघोषीत माहिती अधिकार कार्यकर्त्याला भारती विध्यापिठ पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात गजाआड केले आहे.

दत्तात्रय गुलाबराव फाळके (वय 45, रा. मानसिंग रेसिडेन्सी, तळजाई पठार, धनकवडी) असे त्या स्वंयमघोषीत माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव असुन, याप्रकरणी कोंढव्यातील 30 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुण्यातील रविंद्र बऱ्हाटे हा माहिती अधिकार कार्यकर्ता कोट्यावधी रुपयांच्या खंडणी प्रकरणात गजाआड असतानाच, दत्तात्रय फाळके याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा काळा चेगरा समोर आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय फाळके हा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आढळगाव येथे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे कामाबाबत उत्खनन करताना, कंपणीने त्याच्या परवानग्या घेतल्या का, रॉयल्टी पेमेंट केले का अशी विचारणा फाळके हा मागिल कांही दिवसापासुन करत होता.

तुमच्या कंपणीकडे उत्थखणनाच्या परवाणगी नसल्याने, तुम्हाला शासणाचा मोठा दंड टाळावयाचा असेल अथवा रस्त्याचे काम करायचे असले तर तुम्हाला 2 कोटी रुपये द्यावे लागतील अशी धमकी फाळके देत होता. खंडणी मिळाली नाही तर, तुमच्या हायवेचे कामकाजाबाबत माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करु असे सांगुन, फाळके याने कंत्रांटदारांच्या कंपणीकडे 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती.

दत्तात्रेय फाळके याच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळलेल्या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची तक्रार, पोलिसात दिली होती. फिर्यादी यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेटकडून कात्रजकडे जाणाऱ्या सातारा रोडवरील कात्रज येथील कदम प्लाझा येथे सापळा रचण्यात आला. फिर्यादी यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली.

वरील तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेटकडून कात्रजकडे जाणाऱ्या सातारा रोडवरील कात्रज येथील कदम प्लाझा येथे सापळा रचण्यात आला. यात मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता दत्तात्रय फाळके हा ही 25 लाखांची खंडणी घेण्यासाठी तेथे आला असताना पोलिसांनी त्याला पकडले.