अहो रामदास कदम, अजित पवार यांच्यावर बोलताना तोंड सांभाळून बोला …

0
303

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – शिवसेनेत आत्तापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या पक्षफुटीनंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. आमदारांसोबत आता शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याच भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार-खासदारांनी पक्षावर, उद्धव ठाकरेंवर आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी `टीव्ही ९ `शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता रामदास कदमांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया उमठत आहे. आयपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच अजित पवारांविषयी तोंड सांभाळून बोला असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला आहे.