मादी श्वानाला मारून नऊ पिल्ले पळवली

0
391

सांगवी, दि. १९ (पीसीबी) – फिरस्ती असलेल्या मादी श्वानाला बेदम मारहाण केली. त्यात मादी श्वानाचा मृत्यू झाला. दरम्यान श्वानाला मारून तिची नऊ पिल्ले अज्ञातांनी पळवून नेली. ही घटना १२ जुलै रोजी कृष्णा चौक, नवी सांगवी येथे घडली.

साहिल संजय चौधरी (वय २२, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १८) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची प्राणीमल फाउंडेशन नावाची एनजीओ आहे. या माध्यमातून जखमी प्राण्यांवर फिर्यादी उपचार करतात. फिर्यादी पिंपळे गुरव, नवी सांगवी भागातील बेवारस श्वानांना नेहमी अन्न देत असतात. १२ जुलै रोजी फिर्यादी यांच्या सहकारी महिलेस माहिती मिळाली की, कृष्णा चौकात एक मादी श्वान गंभीर जखमी अवस्थेत आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी श्वानाला ताब्यात घेऊन त्यावर उपचार केले. मात्र उपचारादरम्यान त्या श्वानाचा मृत्यू झाला. कृष्णा चौकात मादी श्वानाने १२ पिलांना जन्म दिला होता. त्यातील नऊ पिल्ले अज्ञाताने पळवून नेली आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.