महाआघाडी २००९ मध्येच होणार होती, पण…

0
294

पुणे, दि. १९ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी २००९ साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती, असा गौप्यस्फोट शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. आत्ताची महाआघाडी २००९ ला होणार होती. फक्त शिरूर लोकसभेमुळं ती अडली असेही आढळराव पाटलांनी म्हटले आहे.

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी युती केली जाणार होती. मला तसं सांगण्यातही आलं होतं, की राष्ट्रवादी आणि शिवसेना युती फायनल झालेली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंची सभा रद्द केली जाणार होती. कारण शरद पवार शिरूरमधून आणि मला मावळमधून लढवायच होतं. मात्र त्यावेळी मला गृहीत धरू नका, असं म्हणून मी बाहेर पडल्याचं आढळराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानंतर ही युती करायचं रद्द झाल्याचे ते म्हणाले. मात्र, आता जी महाविकासआघाडी तेव्हाच झाली असती असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला आहे.