शिवसेनेची नाचक्की, नवनियुक्त जिल्हा प्रमुखाचा तत्काळ राजीनामा

0
306

रत्नागिरी, दि. १८ (पीसीबी) : एकनाथ शिंदे गटात सामील झालेले उदय सामंत यांच्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. नियुक्तीनंतर काही तासातच कोकणात राजीनामा नाट्य रंगले आहे. त्यामुळे रत्नागिरीतून शिवसेनेला पुन्हा एकदा झटका बसला आहे.

नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख प्रकाश रसाळ यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे. कौंटुंबिक आणि आरोग्याचे कारण देत प्रकाश रसाळ यांनी आपला राजीनामा जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे पाठवला आहे.रत्नागिरी तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनीही नियुक्तीनंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तीक आणि कौटुंबिक अडचणीमुळे राजीनामा देत असल्याचे पाटील यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

यात उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप,शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर आणि महिला आघाडी संघटक कांचन नागवेकर यांना शिवसेनेतून हटविण्यात आले होते. रत्नागिरी नगरपरिषदेतील 23 पैकी 20 नगससेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.