अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0
225

चिखली, दि. १८ (पीसीबी) – तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यात मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार फेब्रुवारी 2022 मध्ये कुदळवाडी चिखली येथे घडला. याप्रकरणी तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.

अजिंक्य विकास पाटील (वय 27, रा. चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 16 वर्षीय मुलीच्या आईने 17 जुलै रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षांपासून आरोपी फिर्यादी यांच्या मुलीकडे पाहून येता-जाता हसत असे. 2 सप्टेंबर 2021 रोजी फिर्यादी यांच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी यांच्या मुलीस प्रेमाची मागणी घातली. मात्र मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये फिर्यादी यांची मुलगी घरात एकटी असताना आरोपी घरात आला. त्याने फिर्यादी यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. घडलेल्या प्रकाराबाबत आई, वडिलांना सांगितले तर तुला बघून घेतो, अशी आरोपीने धमकी दिली. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.