खिडकीतून हात घालून मोबाईल पळवला

0
263

चाकण, दि. १८ (पीसीबी) – खिडकीतून हात घालून चोरट्याने मोबाईल चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी खेड तालुक्यातील खालूंब्रे येथे उघडकीस आली.

कानिफनाथ बालाजी ढाकणे (वय 21, रा. खालूंब्रे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या रूमला आतून कडी लावून झोपले असताना रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने रूमला बाहेरून कडी लावली. किचन रूममध्ये चार्जिंगला लावलेला 10 हजारांचा मोबाईल खिडकीतून हात घालून चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.