संत तुकाराम नगर मधून कार पळवली

0
208

संत तुकारामनगर, दि. १८ (पीसीबी) – कारचे लॉक खोलून कार चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री ते रविवारी (दि. 17) सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादीने त्यांच्या मालकीची एक लाख रुपये किमतीची कार (एमएच 12/ईटी 5649) संत तुकाराम नगर येथील बॅडमिंटन हॉल समोर मोकळ्या जागेत पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने त्यांची कार चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.