पवना धरण 65 टक्के

0
232

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणातील पाणीसाठा 65.35 टक्के झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत  पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

पवना धरणातील परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 20 मि.मि.*

# 1 जूनपासून झालेला पाऊस = 1, 393 मि.मि.*

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 673 मि.मि.*

# धरणातील सध्याचा पाणीसाठा = 65.35 टक्के”

# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 36.41 टक्के*

# गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 2.44 टक्के*

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 48.51 टक्के*