महिलेशी मैत्री करून लैंगिक अत्याचार..

0
296

रावेत, दि. १६ (पीसीबी) – महिलेशी मैत्री करून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार सप्टेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत रावेत, विश्रांतवाडी, दिघी येथे घडला.

आकाश दिलीप पंचमुख (वय ३०, रा. दिघी-भोसरी रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय पीडित महिलेने गुरुवारी (दि. १५) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत मैत्री करून त्यांना रावेत येथील मित्राच्या रूमवर, विश्रांतवाडी येथील फिर्यादीच्या घरी, दिघी येथील लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान फिर्यादी गरोदर राहिल्या. फिर्यादीचे अश्लील फोटो, व्हिडीओ काढून त्यांनी लॉजवर येण्यास नकार दिला असता ते फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीशी लग्न करण्यास नकार दिला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.