बलात्कार, गर्भपात आणि पुन्हा बलात्कार; तरुणास अटक..

0
389

वाकड, दि. १६ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार जून २०२० ते १२ मार्च २०२२ या कालावधीत रहाटणी येथे घडला.सचिन संकटमोचन दुबे (वय २८, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय पीडित तरुणीने गुरुवारी (दि. १५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीशी ओळख करून मैत्री केली. फिर्यादीस लग्नाचे वचन आणि आमिष दाखवून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान तरुणी गरोदर राहिली. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तू जेंव्हा तुझ्या पोटातील गर्भ खाली करशील तेंव्हाच मी तुझ्याशी लग्न करेल, अशी धमकी देऊन तरुणीला गर्भपात करण्यास भाग पाडले. ९ जानेवारी २०२१ रोजी फिर्यादीने रहाटणी येथील एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला. त्यानंतरही आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. लग्न न करता तरुणीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.