कंत्राटदाराने केला कामगार महिलेचा विनयभंग..

0
305

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – कंत्राटदाराने कंपनीतील कामगार महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते १० जून २०२२ या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीत घडला.कोतावळे काका (वय ६०, रा. गवळीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एमआयडीसी भोसरी मधील एका कंपनीत काम करत असताना कंत्राटदार आरोपीने त्यांच्याशी गैरवर्तन करून लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना लॉजवर आणि घरी भेटण्यासाठी बोलावून त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. आरोपीने फिर्यादीस वारंवार शिवीगाळ केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.