उघड्या दरवाजावाटे तीन लाखांचे दागिने चोरीला..

0
201

वाल्हेकरवाडी, दि. १६ (पीसीबी) – उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातून दोन लाख ८३ हजार रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. १४) सकाळी वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस आली.अशोक शंकर वाघमारे (वय ६७, रा. गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना त्यावाटे घरात प्रवेश करून घरातील अलमारीतून अज्ञात चोरट्याने दोन लाख ८३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. त्यामध्ये सोन्याचे टॉप्स, चमकी, बाली, चेन, कुडकी, नथ, अंगठी, मिनी गंठण, लॉन्ग गंठण, चांदीचे पैंजण, जोडवी असे दागिने होते. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.