अजंठानगरमध्ये टोळक्याचा राडा..

0
252

निगडी, दि. १६ (पीसीबी) – एका टोळक्याने कोयते हातात घेऊन राडा घातला. तसेच तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. १४) रात्री साडेआठ वाजता अजंठानगर निगडी येथे घडली.निखिल विलास गजरमल (वय २७, रा. अजंठानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष उर्फ व्यंक्या पवार, भैय्या साबळे, आकाश पौळ, सौरभ वाघमारे, राजू तिरकर (सर्व रा. अजंठानगर, निगडी), पवन लष्करे (रा. रामनगर, चिंचवड) आणि सात ते आठ इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी पाणी भरत असताना त्यांच्या परिसरात राहणारे आरोपी फिर्यादी यांना मारहाण करण्याच्या उद्देशाने आरडाओरडा, शिवीगाळ करत कोयते घेऊन आले. त्यावेळी काही नागरिकांनी आरोपींना अडवले असता आरोपींनी नागरिकांना कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींना घाबरून सर्वजण घरांमध्ये पळून गेले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून, या बिल्डींगचा भाई कोण आहे. बाहेर ये. आज तुला संपवतो, असे म्हणून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.