अखेर मिलिटरी डेअरी रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध ..

0
361

– संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला यश…

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्ग अखेर मोकळा झाला असून याबाबत महापालिकेच्या बी.आर.टी.एस.विभागाच्या वतीने ५८,५७,३०,५७७/- रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली असून लवकरच पुलाचे काम सुरु होईल अशी माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी येथील मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित मिलिटरी डेअरी फार्म येथे तयार होणाऱ्या रेल्वे उड्डाणपूल जागेचे डिमार्केशन व इतर कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने तत्कालीन मनपाचे अधिकारी श्री शेटे साहेब श्री रत्नाकर जगताप साहेब यांना दिनांक १ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहणी करताना देण्यात आल्या होत्या त्यानुसार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी ट्रायल पीट घेण्याचे कामास सुरुवात करण्यात आली होती व त्यानुसार केवळ १४ दिवसात रेल्वे लाईन च्या बाजूला ट्रायल पीट घेण्याचे काम पूर्ण झाले होते यानंतर उड्डाणपूल यासंदर्भातील ८०८१ चौरस मीटर क्षेत्रावर काम सुरू करणेबाबतची परवानगी १७ ऑगस्ट २०२० रोजी मिलेट्री डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज लेफ्टनन कर्नल ग्यान प्रकाश यांनी महापालिकेला दिली होती. त्यानुसार महापालिकेच्या वतीने पुढील उर्वरित एकूण २३८४२ स्क्वेअर मीटर ( ५.९८ एकर ) जागा ताब्यात घेणेकामी महापालिकेच्या वतीने एकूण २०.९८ कोटी रुपये माहे जुलै मध्ये भरण्यात आली त्यानुसार रेल्वे उड्डाणपुलासाठी लागणारे संपूर्ण क्षेत्र ताब्यात आल्यानंतर स्थापत्य प्रकल्प विभागाच्या वतीने रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
मिलेट्री डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचे काम मार्गी लावणेकामी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी तत्कालीन रक्षा मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते तसेच मिनिष्ट्री ऑफ डिफेन्स,डिफेन्स इस्टेट ऑफिस याठिकाणी देखील वाघेरे यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. सदर रेल्वे उड्डाणपुलासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील, स्थापत्य प्रकल्प विभागाचे श्रीकांत सवने,बापू गायकवाड,शेखर गुरव,शिनकर मॅडम,संतोष कुदळे यांचे सहकार्य लाभले असल्याने वाघेरे यांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
मुंबई पुणे महामार्ग ते पावर हाउस चौक पिंपरी पर्यंत रेल्वे उड्डाणपुलाचे पुलाचे काम मार्गी लागत असल्याने पिंपरी गाव व परीसरातील नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत.रेल्वे उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाल्यावर शगुन चौक,पिंपळे सौदागर,रहाटणी,काळेवाडी,साई चौकातील भुयारी मार्ग तसेच पिंपरीगाव व परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे तसेच पुणे मुंबई महामार्गाकडे येजा करणाऱ्या नागरिकांना सोयीचे होणार आहे.
सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे उड्डानपुलाचे काम मार्गी लागण्यात यश आले आहे असे मत वाघेरे यांनी व्यक्त केले. सदर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.