आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश…! तब्ब्ल ७३ किलो हेरॉइन जप्त, किंमत जाणून हैराण व्हाल…

0
385

मुंबई,दि.१६(पीसीबी) – नवी मुंबईत क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कोट्यवधींचे हेरॉईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉइनची किंमत ३६२.५ कोटी आहे. काल नवी मुंबई पोलिसांना अमली पदार्थांचा मोठा साठा पकडण्यात यश आले आहे. नवी मुंबईतील पनवेल परिसरातील आजिवली येथील नवकार लॉजिस्टिकच्या कंटेनरमधून हा साठा जप्त करण्यात आला.

सलग दुसऱ्या दिवशी नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाला अमली पदार्थांचा मोठा साठा पकडण्यात यश आले आहे. जप्त करण्यात आलेला हेरॉईनचा साठा हा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट नेटवर्कच्या पुरवठा साखळीचा एक भाग असल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केले आहे. या संपूर्ण रॅकेटच्या नेटवर्क देशातच नाहीतर जगातील इतर देशांमध्येही पसरले आहे.

मुंबईतील चित्रपट उद्योगाशी संबंधित आणि दिल्लीतील हायप्रोफाईल लोकांना अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी नेपाळमधून ड्रग्ज पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. २६ जून रोजी मुंबईतील एका संशयिताला गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्याच्याकडून पाच कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आता हे रॅकेट नेपाळ आणि नंतर मध्य प्रदेशातील भोपाळमधून दिल्ली, महाराष्ट्र आणि यूपी या मोठ्या शहरांमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या ड्रग्स तस्करांना पकडण्यात यश आले आहे.