गेल्या अडीच वर्षात शिवसैनिकांना काय मिळालं ? शिवसैनिकांना किती काम झाली ?

0
249

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आम्ही ऐतिहासिक घडामोडी केल्या आणि हा मेळावा देखील ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. आमच्या कृतीची दखल महाराष्ट्र, देश नाहीतर जगातील ३३ देशातील घेतली असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे यांनी मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसैनिकांची उपेक्षा झाल्याची टीका केली. तर, संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

सरकार म्हणून ज्यावेळी आपण असतो, आपला मुख्यमंत्री असतो त्यावेळी आपली चार काम झाली पाहिजेत, अशी अपेक्षा असते पण दुर्दैवानं तसं झालं नाही. काम दुसऱ्यांची झाली, पक्ष तिसऱ्यांचा वाढत होता. नगरपंचयात निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेली, असल्याचं शिंदे म्हणाले. आम्ही हे आनंदानं केलं नाही. गेल्या अडीच वर्षात शिवसैनिकांना काय मिळालं? शिवसैनिकांना किती काम झाली? शिवसैनिकांच्या आयुष्यात काय बदल झाला नाही. शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल झाल्या, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.