खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच

0
185

– चिठ्ठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट ओढतात…

नागपूर, दि. १५ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल पार पाडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका कृतीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शेजारी ब सलेल्या फडणवीसांनी हळूच खिशातून पेन काढला, एक चिठ्ठी लिहिली आणि नकळत ती एकनाथ शिंदेंकडे सरकवली. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून त्यावर अनेक नेत्यांनी टीकाही केली आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत.

संजय राऊत म्हणाले की, चिठ्ठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट ओढतात, अशा अनेक गमतीजमती राज्यात होत असतात. खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. यापूर्वी अजित पवारांनीही या प्रकारावरुन राज्य सरकारवर टीका केली होती. काल माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, २.५ वर्षात आम्ही कधी माईक कधी खेचला नाही. ही तर सुरुवात आहे. आत्तापासून ओढा ओढी असेल तर महाराष्ट्राने हे पाहावं. कॅमेऱ्यामध्ये सगळं काही दिसत असतं.