ढोल ताशा पथकांकडून भाडे आकारणी करू नये , शत्रुघ्न काटे यांचं आयुक्त राजेश पाटलांना निवेदन

0
367

पिंपरी दि. १४ (पीसीबी) -गणेशउत्सवच्या काळात गणपती बाप्पा अगमनाच्या एक महिना पूर्वीपासूनच पिंपरी चिंचवड शहरातील ढोल ताशा पथके बाप्पाच्या आगमनासाठी तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत सराव सुरू करतात. त्यांना सराव करण्यासाठी पालिके मार्फत जागा उपलब्ध करून दिली जाते आणि त्या मोबदल्यात पालिका त्या पथकाकडून एक ठराविक अशी रक्कम भाडे स्वरूपात आकारात असते. यापुढे भाडे आकारणी करू नये, अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

या पारंपरिक , शिस्तबद्ध आणि रुबाबदार ढोलपथकांमुळे पारंपरिक मिरवणुक काढत श्रीगणेशाचे थाटात आगमन आणि विसर्जन दोन्ही पार पाडतात . तरुणांची मोठी फौज या ढोलताशा पथकात दिसते. अभ्यास, कार्यालय सांभाळून ही मंडळी ढोलताशाचा सराव करतात.मुख्य वादनाच्या काही महिने आधीपासूनच सरावाला सुरुवात करतात.

अश्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेणाऱ्या व आपल्या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या आपल्या या ढोल ताशे पथकांना पालिकेमार्फत एक सामाजिक बांधिलकी म्हणून शत्रुघ्न काटे यांनी पुढाकार घेत पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक ढोल ताशांची संस्कृतीला वाव देणेहेतू पालिका आयुक्त राजेश पाटील यांना आपल्या लेखी निवेदनातून मागणी केली आहे कि पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक ढोल ताशे पथकाला सराव करण्यासाठी पालिकेच्या मालकीची उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवर कुठल्याही प्रकारची भाडे आकारणी करण्यात येऊ नये . सदर जागा ढोल ताशे पथकांना सराव करण्यासाठी मोफत करून या एक सामाजिक उपक्रमात हातभार लावता येईल अश्या आशयाचे निवेदन दिले आहे.