आता सायबर सेलची २४ तास सेवा उपलब्ध

0
254

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) :- सायबर गुन्ह्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळावा यासाठी आता सायबर सेलची २४ तास सेवा उपलब्ध राहणार आहे. याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.

मोबाईल व ऑनलाईन बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्राईमचा वाढू लागला आहे. मागील सहा महिन्यात पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे सुमारे साडे तीन हजार तक्रारी आल्या आहेत. यातील अनेक प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अलीकडे काही वर्षात कॅशलेस व्यवहारात वाढ झाली आहे. कोणतीही खात्री न करता मोबाईल अॅप डाऊनलोड केले जात आहेत. महिलांचे बनावट प्रोफाईल तयार करणे, अश्लील फोटो वेबसाईट्सवर टाकणे या गुन्ह्यांचा छडा लावणे हे देखील पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे.

सायबर गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी सायबर सेल अंतर्गत नवीन डेस्क सुरू करण्यात येत आहे. यामध्ये २४ तास अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहून नागरिकांचे समाधान करतील, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.