आगामी निवडणुकांत युवकांना जास्तीत जास्त संधी मिळणार

0
182

– राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश बैठकीत मत

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – आगामी महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे असे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सांगितले.मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी आढावा बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सदर बैठकीला प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील साहेब, माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब, मा. छगन भुजबळ साहेब, मा. एकनाथराव खडसे साहेब, खा. सुप्रियाताई सुळे, युवक अध्यक्ष मेहबूब भाई शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे यासंह राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष तसेच प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मा. सूरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युवकांविषयी आपली भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच कार्यक्षम युवकांना संधी देण्याचे काम करत आला आहे. विशाल वाकडकर आणि विशाल काळभोर यांनी प्रदेश स्थरावर काम करत असतानाच आपले शहर आणि आपल्या प्रभागात ज्या पद्धतीने काम केले आहे, सामान्य लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची तत्परता, कोरोना काळातील त्यांचे समाजकार्य, विविध समाजउपयोगी उपक्रम राबवून, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जनमानसात पोचविण्याची त्यांची जिद्द पाहून नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व वरिष्ठ नेते आपल्या पाठीशी निश्र्चितच उभे राहतील यात शंका नाही…

विशाल वाकडकर यांनी २०१७ ते २०२२ या वर्षात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. २०१७ साली पक्ष राज्यात, केंद्रात आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतही विरोधी बाकावर होता. अशा परिस्थितीत वाकडकर यांनी प्रभागनिहाय युवक संघटन मजबूत करून, विविध आंदोलने तसेच मोर्चे काढून शहरातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यासोबतच महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम केले. यावेळी त्यांनी तयार केलेली जवळपास ४७५ पेक्षा जास्त सक्रिय युवकांची संघटना, या युवक टीम ने महानगरपालिकेच्या चुकीच्या धोरणा विरोधात जोमाने काम केले होते. याच युवकांच्या कामाच्या जोरावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर ला महाराष्ट्रातील सर्वोत्तम युवक संघटन असा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

आगामी निवडणुकांमध्ये शहरातील विशाल वाकडकर याच्या कार्यकाळातील जवळपास २० ते २२ युवकांना त्यांच्या कामाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तिकीट मिळेल आणि अशा युवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच असेल.याच पद्धतीने युवक फळीने काम केल्यास पुढील होणाऱ्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष ठरेल असा विश्वास सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला…