काळानुसार ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवा – श्री. पराग गोखले

0
265

पिंपरी दि. १४ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड : ‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा सामाजिक जीवनात धर्माचे अधिष्ठान आले की, व्यक्ती नीतीमान बनतो आणि गैरप्रकार करण्यापासून परावृत्त होतो. त्यामुळे धर्माचे अधिष्ठान असेल, तरच धर्मनिष्ठ अर्थात् आदर्श अशा समाजाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राला खर्‍या अर्थाने उर्जितावस्था मिळवायची असेल, तर प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन श्री.पराग गोखले यांनी या वेळी केले. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.

1) थोपटे लॉन्स ,रहाटणी २) अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय,तळेगाव दाभाडे ३) राजा शिवछत्रपती सभागृह,जुन्नर याठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तसेच सनातन संस्थेच्या वतीने देशभरात 154 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या कार्यक्रमाला पनून काश्मिर संघटनेचे श्री. राहुल कौल आणि अन्य मान्यवरांनी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.

महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.या वेळी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली.या कार्यक्रमालाहजारोंच्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते.

9 भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ : यंदाच्या वर्षी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलुगु, गुजराती, बंगाली, ओडिया या 9 भाषांत ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील हजारो भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला. देशभरात अन्य ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूंकडून शिकणे’, मराठी भाषेतील ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास’, तसेच इंग्रजी भाषेतील ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेज् स्पिरिच्युअल वर्कशॉप्स इन 1992’, ‘सिकर्स रिव्हील युनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’, ‘एफर्टस् ॲट द स्पिरिच्युअल लेवल फॉर रिमूव्हल ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्टस्’ आणि ‘हाऊ टू प्रोग्रेस फास्टर स्पिरिच्युअली थ्रू सत्सेवा ?’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.