माझ्या आईलाही तुमच्यासारखी सोन्याची माळ घ्यायची आहे म्हणत …

0
459

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – दुकानात एकटी महिला असताना दोघेजण दुधाचा चीक विकण्याच्या बहाण्याने आले. दुकानदार महिलेच्या गळयातील सोन्याच्या माळेसारखी माळ माझ्या आईला सुद्धा विकत घ्यायची आहे, असे म्हणून फोटो काढण्याच्या बहाण्याने सोन्याची माळ घेऊन दोघेजण पसार झाले. ही घटना सोमवारी (दि. ११) सकाळी भोसरी गावठाण येथे घडली.

याप्रकरणी महिलेने दोघांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे भोसरी गावठाण येथे किराणा दुकान आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता फिर्यादी महिला दुकानात एकट्याच होत्या. त्यावेळी दोघेजण दुकानात दुधाचा चीक विकण्याच्या बहाण्याने आले. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्यात असलेल्या सोन्याच्या माळेसारखी माळ त्याच्या आईला देखील घ्यायची असल्याचे सांगून फिर्यादी यांना सोन्याची माळ फोटो काढण्यासाठी काढायला लावली. दरम्यान एकाने दुधाचा चीक विकत घेण्यासाठी फिर्यादी यांना आग्रह करून बोलण्यात व्यस्त ठेवले. तेवढ्यात दुस-याने फिर्यादी यांची ५० हजारांची सोन्याची माळ घेऊन पोबारा केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.