प्रियांका उमरगेकर मृत्यूप्रकरणी पतीसह सासू सास-यांवर गुन्हा दाखल

0
270

आळंदी : आळंदी येथील प्रियांका अभिषेक उमरगेकर यांच्या मृत्यूप्रकरणी आळंदी पाेलीसांनी पतीसह सासू सास-यांवर गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पाेलीसांनी ही कारवाई केली आहे.

प्रियांका उमरगेकर यांनी राहत्या घरी गळफस लावून आत्यहत्या केल्याची घटना नुकतीच घडली हाेती. प्रियांका या पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका कमल घोलप यांची कन्या हाेत. त्यांचा विवाह आळंदी पालिकेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचा मुलगा अभिषेक याच्याशी झाला हाेता.

या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पाेलीसांत उमरगेकर यांच्या कुटुंबियांच्या विराेधात तक्रार नाेंदवली. या तक्रारीत सासरच्यांचा छळ, अपमानास्पद वागणुक आदी त्रासामुळे प्रियाकांने आत्महत्या केल्याचे म्हटलं आहे. या तक्रारीनूसार पाेलीसांनी (कलम 304 (ब), 306, 498 (ब), 34) आळंदीच्या भाजपच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, अशोक उमरगेकर, प्रियांकाचे पती अभिषेक उमरगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.