मोहम्मद जुबेरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
396

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) : आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर न्यायालयाने ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला आहे. जुबेरला २५ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. त्याची पोलिस कोठडी देण्यास न्यायालयाने नकार दिला. जुबेरच्या जामीन अर्जावर न्यायालय १३ जुलै रोजी सुनावणी करणार आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी जुबेरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुबेरला आता सीतापूर कारागृहात राहावे लागणार आहे. आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी दिल्लीच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर झुबेरला उत्तर प्रदेशमधील सीतापूर येथे नेण्यात आले. जिथे तीन व्यक्तींविरुद्ध ट्विटद्वारे धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.