पादचारी महिलांचे दागिने हिसकावले

0
222

निगडी, दि. १० (पीसीबी) -रस्त्याने पायी जाणा-या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या दोन घटना शनिवारी घडल्या. याप्रकरणी शनिवारी (दि. 9) एमआयडीसी भोसरी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मोशी येथील घटनेत 32 वर्षीय महिलेने दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मोशी मधील सेक्टर क्रमांक 13 येथून पायी जात होत्या. दरम्यान दुचाकीवरून (एम एच 12 / पी पी 2431) आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 30 हजरांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

निगडी येथील घटनेत 32 वर्षीय महिलेने दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला शनिवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास त्यांच्या मुलाला स्कुल बसमधून घेऊन घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. सेंट्रल बॅंकेसमोरील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 40 हजारांचे मंगळसूत्र आणि 40 हजारांची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.