वोडाफोन कंपनीच्या मोबाईल टॉवर मधील साहित्य चोरीला

0
294

हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) – वोडाफोन कंपनीच्या मोबाईल टॉवर मधील टॉवर, ट्रॉली, बॅट-या, जनरेटर बॅटरी, जनरेटर असे साहित्य चोरून नेले. ही घटना 7 एप्रिल ते 29 जून या कालावधीत बावधन येथे घडली.

अनोज बाळासाहेब मोरे (वय 41, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वोडाफोन कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या देखरेखीचे काम फिर्यादी यांच्या कंपनीकडे आहे. बावधन येथील टॉवर मधून अज्ञात चोरट्यांनी 10 हजारांचा टॉवर, 20 हजारांची ट्रकची लोखंडी ट्रॉली, 20 हजारांच्या बॅट-या, पाच हजारांची जनरेटरची बॅटरी, 10 हजारांचे पॉवर प्लांट, 50 हजारांचे डिझेल जनरेटर असा एक लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.