महापालिका निवडणूक! अंतिम मतदार यादीसाठी 16 जुलै पर्यंत मुदत

0
182

पिंपरी दि. ६ (पीसीबी) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी महापालिकेला मुदतवाढ मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने  एका आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. 16 जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीची फोड करून तीनच्या प्रभागानुसार प्रारूप मतदार यादी तयार केली. पण, ही मतदार यादी तयार करताना मोठ्याप्रमाणात घोळ झाला आहे. यामध्ये प्रारूप यादी तयार करताना क्षेत्रीय कार्यालयावर संगनमत करून नावे यादीत टाकली आहेत. त्यात अनेक बोगस मतदार टाकल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसणार आहे असाही आरोप झाला होता. त्यामुळे बहुतांश सर्व प्रभागातील हजारो मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. त्यामुळे हक्काचे मतदार दुसरीकडे गेल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.

प्रारूप मतदार यादीवर तब्बल 8 हजार 700 नागरिकांच्या हरकती आलेल्या आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी लागणार असल्याने 9 जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी तयार अशक्य आहे. त्यामुळे  मुदत वाढवून द्यावी अशी मागणी महापालिकेने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने 16 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.