घरफोडी करून एक लाखाचा ऐवज पळवला

0
241

पिंपळे निलख, दि. ६ (पीसीबी) – पिंपळे निलख येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्याने 99 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी उघडकीस आली.

ज्ञान रौनक अजय प्रताप सिन्हा (वय 34, रा. विशालनगर पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 3) रात्री दहा ते सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांचे घर बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडून बेडरूममधील ड्रॉवरमधून फिर्यादी यांना त्यांच्या लग्नात मिळालेल्या तीन सोन्याच्या अंगठ्या, एक प्लॅटेनियमची अंगठी आणि एक मोबाईल फोन असा 99 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.