माझी एमआयडीसी, स्वच्छ एमआयडीसी, हरित एमआयडीसी अंतर्गत वृक्षारोपण

0
317

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – माझी एमआयडीसी, स्वच्छ एमआयडीसी, हरित एमआयडीसी या अभय भोर यांच्या संकल्पनेनुसार फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे एमआयडीसी परिसरात  महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

उद्यान विभाग उपाआयुक्त सुभाष इंगळे उद्योजकांच्या  उपस्थितीत भव्य वृक्षरोपण समारंभ संपन्न झाला. हा उपक्रम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर व पिंपरी-चिंचवड महापालिका उद्यान विभाग यांनी पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आला होता.  एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्यांनी आपल्या बाहेरील बाजूस सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण संस्कार उद्यानाच्या बाहेरील बाजूस देखील वृक्षारोपण करण्यात आले. कंपनी बाहेरील केलेल्या सुशोभीकरणाचे उद्घाटन आयुक्त पाटील यांनी केले.

अभय भोर म्हणाले, प्रत्येक उद्योजकास कंपनी बाहेरील बाजूस वृक्षारोपण करण्यास पुढाकार घेतलाच पाहिजे. एमआयडीसी परिसरात कामगारांच्या आरोग्यासाठी तसेच प्रदूषण मुक्त वातावरण निर्मितीसाठी आणि कंपन्या बाहेरील बाजूस सुशोभीकरण केल्यास नक्कीच शहराला एक वेगळे स्वरूप प्राप्त होईल. एमआयडीसी परिसरात  21000 झाडे लावण्याचा उद्दिष्ट करण्यात आलेले आहे. एमआयडीसीमध्ये प्रत्येक कंपनी बाहेर सुशोभीकरण करण्यासाठी  पाठपुरावा चालू केला आहे. कंपन्यांचा सहभाग यामध्ये वाढत आहे. वृक्षारोपणामध्ये पर्यावरण उद्यानाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आले.

माझी एमआयडीसी  हरित एमआयडीसी या नाम फलकाचे उद्घाटन केले  आयुक्त पाटील यांनी केले.  आयुक्तांनी  उद्योजकांबरोबर संवाद साधून महापालिकातर्फे उद्योजकांसाठी अनेक मूलभूत सुविधा चालू केल्या असून उद्योजकांना कोणत्याही अडचणी असल्यास त्याबाबत पाठपुरावा करून त्वरित सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर,  बन्सी मंघानी,  मिलिंद काळे, वैभव जगताप, विनायक बसरकर, दुर्गा ब्रिगेड अध्यक्षा दुर्गा भोर, क प्रभाग आरोग्य निरीक्षक माने साहेब,शिवाजी पाटील, जसबिंदर सिंग व उद्योजक उपस्थित होते.