अश्लील व्हिडीओ दाखवून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीला अटक

0
696

चिखली, दि. ५ (पीसीबी) – पत्नीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. पतीचे अनेक महिलांसोबत सुरु असलेले अनैतिक संबंध पत्नीने उघडे पाडले असल्याने तिला धमकी देऊन तिचा छळ केला. पत्नीच्या चारित्र्यावर सांशय घेऊन तिची बदनामी केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 20 फेब्रुवारी 2009 ते 13 ऑक्टोबर 2021 या कालावधीत तळवडे, चिखली आणि गुरसाळे, माळशिरस येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पतीने अश्लील व्हिडीओ दाखवून फिर्यादीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. पतीचे अनेक महिलांसोबत असलेले अनैतिक संबंध फिर्यादी यांनी उघडे पाडले, त्यावरून पतीने त्यांना धमकी दिली. शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करत घरातून हाकलून दिले. फिर्यादी यांना अनोळखी व्यक्ती भेटण्यासाठी आला असल्याचे छुप्या कॅमे-याद्वारे व्हिडीओ बनवून तो त्यांच्या भावाला पाठवून फिर्यादीची बदनामी केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.