अजित पवार विरोधीपक्ष नेतेपदी

0
280

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असे पत्र विधानसभा तालिका अध्यक्षांना दिले. अजित पवार हे सलग सात वेळा आमदार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकिमध्ये आमदारांकडून अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्ष नेते पद देण्याची मागणी करण्यात आली होती. या पदाला अजितदादांच योग्य न्याय देऊ शकतात, असे मत आमदारांनी व्यक्त केले होते.शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे विधीमंडळात आता शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी मोठा पक्ष झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे येणार आले आहे. राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी आमदारांची बैठक रविवारी बौलावण्यात आली होती. त्यावेळी आमदारांनी अजित पवार यांच्या नावाला पसंती दिली होती. त्यामुळे त्यांचे नाव निश्चित करण्यात आले.

विरोधी पक्षनेते हा जनतेची न्यायबाजू मांडणारा नेता असतो. विरोधी पक्षनेता हा सत्तारुपी हत्तीवर अंकूश ठेवणारा, असतो. काम करणे त्यांना सोपे जाईल. लोकशाहीचा परिनाम या सभागृहात पाह्यला मिळत आहे, असे विरोधी पक्षनेत्याच्या अभिनंदन प्रस्थावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद सांभाळलेले आहे, असेही शिंदे म्हणाले.