बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले 65 लाखांचे मिळकत तारण कर्ज

0
262

वाकड, दि. ४ (पीसीबी) – बनावट कागदपत्रे सादर करून बँकेकडून 65 लाख रुपयांचे मिळकत तारण कर्ज घेत बँकेची फसवणूक केली. हा प्रकार 5 फेब्रुवारी 2018 ते 2 जुलै 2022 या कालावधीत वाकड येथील साऊथ इंडियन बँकेत घडली.

स्वप्नील मधुकर भूमकर (रा. हिंजवडी), प्रवीण शिंदे (रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बँक मॅनेजर सौम्या गोपालन नायर (वय 35, रा. पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून स्वप्नील भूमकर याच्या दोन फ्लॅटवर तारण कर्ज मिळवण्यासाठी स्वप्नील भूमकर याचे सन 2014-15, सन 2015-16 या दोन वर्षांचे रिटर्न चुकीचे दाखवले. तसेच स्वप्नील भूमकर याचे ऍक्सिस बँकेच्या खात्याचे बँक स्टेटमेंट बनावट सादर केले. त्याआधारे साऊथ इंडियन बँकेच्या वाकड शाखेतून 65 लाख रुपये मिळकत तारण कर्ज घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.