मुंबई , दि. ३० (पीसीबी) – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाला . आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडला आहे .एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपत घेतली
बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर असल्याची भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत. एकनाथ शिंदे यांना ‘मातोश्री’चे निष्ठावंत संबोधले जातं, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झटका दिला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 50 आमदार आहेत. यात अपक्ष आमदारांचाही समावेश आहे.
एकनाथ शिंदे (58) यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला आणि त्यांचे बालपण गरिबीत गेले. ते 16 वर्षांचे असताना त्यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी बराच काळ ऑटो रिक्षाही चालवली. याशिवाय पैसे मिळवण्यासाठी त्यांनी दारूच्या कारखान्यात काम केलं.
1980 च्या रोजी त्यांच्यावर बाळ ठाकरेंचा खूप प्रभाव होता आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना प्रवेश केला. एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेशी संबंधित असून ते सध्या ठाण्यातील पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे.