पुणे शिवसेनेत मोठी फूट

0
314

– माजी मंत्री विजय शिवतारे शिंदे यांच्या बरोबर

पुणे, दि. २९ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री विजय शिवतारे एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती तोडावी अशी भूमिका आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केली, विजय शिवतारेच्यां भूमिकेमुळे शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठ खिंडार पडणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आहे ती संघटनेसाठी आहे, आम्ही एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणं क्रम प्राप्त आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस बरोबर जाऊ नका अशी विनंती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व जणांनी उद्धव ठाकरेंना केली होती पण दुर्दैवाने एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला दाद मिळाली नाही. आढळराव सारखा लोकांची मतं असणारा माणूस त्यांनी विनंती केली की आम्हाला जगू द्या पण ती दाबली जात होती, हे आम्ही लेखी पत्रातून देखील दिलं पण संरक्षण दिले गेलं नाही असेही त्यांनी सांगितलं.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत पण त्यांना घेरले आहे, उद्धव ठाकरेंना आम्ही पत्र देतोय की आम्ही त्यात आमच्या व्यथा मांडल्या जिथे आमचे कामं झाले नाहीत. आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक आहोत, मात्र आम्ही महविकास आघाडी बरोबर नाहीत. ५१ आमदारांनी सांगितल्या नंतर महाराष्ट्रातील लोकांना समजत नाहीय की काय होणार, आमचं म्हणणं एकच आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडा, असे विजय शिवतारे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार झालेल्या जेष्ठ नेते शिवाजीराव आढाळराव यांनीही राष्ट्रवादी बरोबर राहिलो तर भवितव्य नसल्याचे सांगत आपली नाराजी उघड केली आहे. महाआघाडीत शिवसेना आणि शिवसैनिकांची घुसमट होत असल्याचे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. आढाळराव यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या विधानामुळे आता जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर, भोसरी आणि हडपसर यया विधानसभा मतदारसंंघातील शिवसेनेला हादरा बसला आहे.