आत्मनिर्भर भारतासाठी “उडान” उपक्रम प्रोत्साहनात्मक ठरेल

0
271

– स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांचे मत

– “उडान २०२२” आंतर महाविद्यालय बिझनेस प्रोजेक्ट स्पर्धेत १६० स्टार्टअप नवकल्पनांचे सादरीकरण

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, लोकसंख्या, मागणी या स्तंभाच्या विकासाकरीता देशातील अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना राबविली जात आहे. याद्वारे कार्यक्षम, स्पर्धात्मक आणि लवचिक धोरणांचा अवलंब करून स्वयं-उत्पादक होण्याच्या संदर्भात आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कल्याणासाठी “उडान २०२२” हा उपक्रम प्रोत्साहनपर ठरणार असल्याचे मत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी व्यक्त् केले.

पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर आणि पीसीएमसी स्मार्ट सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनेजमेंट अँड रिसर्च (IICMR) एमबीए विभाग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पुणे डेक्कन इंडिया चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी प्राधिकरण येथील आयआयसीएमआर कॉलेजमध्ये “सबका भारत निखरता भारत” उपक्रमांतर्गत दि. २५ ते २७ जून या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील “उडान” या आंतर महाविद्यालयीन बिझनेस प्रोजेक्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या योजनांबददल माहिती देताना श्री. किरणराज यादव बोलत होते.

यावेळी, आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, अभि लॉजिस्टिक्सचे ग्रुप चेअरमन डॉ. जितेंद्र जोशी, एमडी आणि सीईओ कला जेनसेटचे मनोज फुटाणे, व्हीपी कॉर्पोरेट रिलेशन आणि न्यू इनिशिएटिव्ह्स बीव्हीजी ग्रुप डॉ. दत्तात्रय गायकवाड, ऑटो क्लस्टर व पीसीएसआयसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. किरण वैद्य, एमबीए विभागाच्या प्रमुख डॉ. मनीषा कुलकर्णी, पीएमआय पुणे डेक्कन इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष जय ढोलकिया, व्यवस्थापक उदय देव, आदित्य मसारे आदी मान्यवर उपस्थित होते.

धोरण आणि प्रकल्प व्यवस्थापन कौशल्ये ही उद्योजकांसाठी प्रमुख कौशल्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी उडान सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणांना उद्योजकतेकडे प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे डॉ. अभय कुलकर्णी यांनी सांगितले. सदर कार्यक्रमामध्ये कार्यक्रम आयडिया फेस्ट, मॉक स्टॉक, बॉली इमिटेशन अशा १६० स्टार्टअप कल्पनांचे सादरीकरण झाले. तसेच, उद्योजकांची यशोगाथा, स्टार्टअप पिच आणि कॉर्पोरेट्ससह कॉफी आदी कार्यक्रम देखील घेण्यात आले. नव स्टार्टअपना त्यांच्या व्यावसायिक कल्पना गुंतवणुकदारांच्या पंचासमोर मांडण्याची संधी देण्यात आली होती. UDAAN च्या समन्वयक दिप्ती बाजपेयी, दिलीप पवार, स्मार्ट सारथी टीमचे प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.