अजित पवार यांना कोरोना…!

0
276

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय गोंधळ सुरू आहे, यादरम्यान राज्याते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांंनी स्वतः ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले की, “काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”, असे त्यांनी म्हटले आहे.