जालना, दि. २४ (पीसीबी) – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ईडीकडून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात ED ने PMLA अंतर्गत सावरगाव हडप, तालुका आणि जिल्हा जालना, महाराष्ट्र येथील जालना सहकारी साखर कारखाना लि.ची जमीन, इमारत आणि संरचना, अवशिष्ट प्लांट आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय जी उलाथपालथ सुरू आहे त्यातील बंडखोरीमध्ये सहभागी बहुसंख्या आमदारांवर ईडी ची कारवाई सुरू आहे किंवा प्रस्तावित आहे. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना ईडी ची नोटीस आल्यानंतर आठवडाभरात त्यांचे पिताश्री एकनआथ शिंदे यांनी बंडाचे निशान फडकावले. आमदार प्रताप सरनाईक यांची ४५ कोटींची मालमत्ता ईडी ने जप्त केल्यानंतर त्यांनी थेट उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून अशा प्रकारे छळ होणार असेल तर सरळ भाजपा बरोबर चला, असा सल्ला दिला होता. अनेक आमदारांच्या व्यवहारांची चौकशी ईडी मार्फत सुरू आहे. आमदार खोतकर हे बंडामध्ये सामिल झाले नाहीत म्हणून त्यांच्यावरची कारवाई जोमात सुरू करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Home Maharashtra एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ईडीकडून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने...