मी एकनाथ शिंदे साठी काय कमी केले…

0
246

मुंबई, दि. २४ (पीसीबी) :शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. शिवसेनेत बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर त्यांनी घणाघात केला.

“जे सोडून गेले त्याचे मला वाईट का वाटावं, एकनाथ शिंदेंना मी माझ्याकडील दोन खाती दिली. नगरविकासमंत्री हे महत्वाचे पद दिले. माझं मुख्यमंत्रीपद मान्य नसणं ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे. मी लायक नसेल तर पद सोडायला तयार आहे,” असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

भविष्य दिसत असेल तर खुशाल जा…
“ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा,” असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना दिले. “मी जिद्द सोडली नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. “कोण कसं वागलं याच मला जायचे नाही, तुम्हाला जर भविष्य दिसत असेल तर खुशाल जा,” असा उपरोधात्मक सल्ला मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दिला.

मला वाटलं सीएमची खूर्ची हलतेयं, पण ते मानेचं दुखणं होतं..

“कोरोनामुळे माझ्या डोळ्यात पाणी, हे अश्रू नाही. मी मी जिद्द सोडलेली नाही. मला वाटलं सीएमची खूर्ची हलतेयं, पण ते मानेचं दुखणं होतं,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला. “झाडांची फुले ना,फांद्या ना मात्र मूळ नेऊ शकत नाहीत,” असे ते म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री..
संजय राठोडांवर वाईट आरोप होऊन सुद्धा मी त्यांना सांभाळलं.
बंडखोरांनी सेना फोडण्याची पाप केले, भाजपने साधलेला हा डाव आहे.
आपलीच काही लोक घेऊन सेनेवर सो़डविण्यात आले.
एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केले.
हे सारं भाजपनं केले आहे, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल.
मला सत्तेचा मोह नाही.