भास्कर जाधव गुहाटीला नाहीत, चिपळूणमध्येच

0
284

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरीकरून 40 च्यावर आमदार गुवाहाटी येथे घेऊन गेले. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत काम करायच नाही, महाविकास आघाडीतून बाहेर पडा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अजून काही आमदार त्यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा सुरु असताना शिवसेनेचे आक्रमक आमदार भास्कर जाधवही सध्या नॉट रिचेबल असल्याने चर्चेला उधाण आले आहे. मागच्या दोन दिवसांपासून जाधव यांना शिंदे गटाकडून फोन करून संपर्क करण्यात येत होता. ते गुवाहाटीला निघाले असल्याचे वृत्त येत असताना त्यांच्याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
जाधव हे चिपळूण मध्येच असल्याचे त्यांच्या स्वीयसहायकाने स्पष्ट केले आहे.

“जाधव हे चिपळूणमध्येच आहेत त्यांच्या बंधूची शस्रक्रिया झाल्यामुळे जाधव चिपळूणमध्ये आले असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यकांनी दिली आहे.वरिष्ठ नेत्यांना कल्पना देऊनच जाधव गावी आल्याचे सांगण्यात आले.

भास्कर जाधव गुहावटीमध्ये गेल्याच्या बातम्या निराधार असल्याचेही सांगण्यात आले. जाधव हे गुहागरचे शिवसेनेचे आमदार आहेत. ते सेनेचे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. जाधव यांनी महाविकास आघाडीच्या वतीने भाजपला जोरदार विरोध करीत असतात.