– कष्टकऱ्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या १८ सेवा व हेल्पलाईनचे उद्घाटन
– वारकऱ्यांना सेवा देणे हे समाधान देणारे : बाबा कांबळे
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – वारकऱ्यांना जात – पात, धर्म नसतो. पंढरीला जाणारी वारी म्हणजे माणसाच्या सद्भावनेची वारी आहे. या मध्ये सर्व धर्मातील लोकांचा सहभाग असतो. माणसातल्या सत्य व अध्यात्म निष्ठेची ही वारी आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत व कष्टकरी जनता आघाडीने मानवता, विठ्ठलाच्या सेवेचा ध्यास घेतला आहे. त्यांनी वारकऱ्यांची सेवा करण्याचे घेतलेले व्रत निशब्द करणारे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जेष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत व कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने वारकऱ्यांना विविध प्रकारच्या १८ सेवा मोफत दिल्या जात आहेत. त्या उपक्रमाचे व त्या वेळेस हेल्पलाईनचे उदघाटन डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सबनीस बोलत होते.
पिंपरी चिंचवड मधील निगडी, पिंपरी येथून तर पुणे येथे संत देवाजी मंदीरा समोर वारकऱ्यांची सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महाराष्ट्र पंचायतचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी
डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते 18 सेवा हेल्पलाईनचे उदघाटन करण्यात आले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, ग्राहक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, माता रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, रूग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण, आनंद तांबे, दत्तात्रय शिंदे, राजू पोटे आदी उपस्थित होते.
या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, वारकऱ्यांच्या सेवेतच विठुमाऊलीचे दर्शन आम्हाला मिळत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करण्याचा ध्यास आम्ही घेतला. त्यांना विविध प्रकारच्या १८ सेवा दिल्या जात आहेत. संघटनेचे पदाधिकारी या मध्ये सहभागी आहेत.निगडी, पिंपरी बोपोडी आता पुणे शहरात हि सेवा देण्यात आली, उद्या हडपसर येथे हि सेवा दिली जाणार आहे, पंढरपूर पर्यंत ही सेवा आम्ही देणार आहोत. वारकऱ्यांना सेवा देणे हे समाधान देणारे, असल्याचे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले.
आरोग्य सेने तर्फे एक लाखांपेक्षा अधिक रकमेची औषधे उपलब्ध करून देण्यात आली, डॉ. समीर शेख यांनी वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली,
महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष शफिक भाई पटेल, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष मुराद काजी, अरशद अन्सारी, अविनाश वाडेकर, विलास केमसे,आयाज शेख, किरण एरंडे, स्वामी महालिंग, कुमार शेट्टी, मोहम्मद शेख, संजू शिंदे, संजय गुजलेकर, हुसेन शेख, अकबर शेख, तौफिक कुरेशी, सलीम सय्यद, सलमान तांबोळी, मुक्तार कोतवाल यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. डॉक्टर समीर शेख मोफत यांनी आरोग्य सेवा दिली.