लघु उद्योगजकतेला प्रोत्साहन’ देण्यासाठी बस यात्रा

0
166

पिंपरी दि. २१ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य को शाल्य विकास सोसायटी युथ एड फाउंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नामधून ‘लघु उद्योगजकतेला प्रोत्साहन’ देण्यासाठी आयोजित केलेल्या बस यात्रेचे ‘पिंपरी चिचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त  आयुक्त विकास ढाकणे यांनी  स्वागत केले. 

युथ एड फाउंडेशनचे अध्यक्ष मॅथ्यू मत्तम यांनी महापालिका अतिरीक्त आयुक्त यांना उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण उपक्रमाची माहिती दिली तसेच पुढील आठवड्यात शहरातील महिला व युवकांसाठी  उद्यमिता या विषयावर कार्यशाळा घेतल्या जातील असे सांगितले . उद्यमिता यात्रेच्या वतीने विकास ढाकणे यांना वृक्ष भेट देण्यात आली. त्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले. महापालिका प्रांगणात   झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त ढाकणे म्हणाले ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभाग आणि युथ एड फाउंडेशन यांनी राज्यात कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. उद्यमिता यात्रेच्या माध्यमातून लघु उद्योजक तयार होणे आशादायी आहे. व त्यांनी उद्यमिता यात्रेचा प्रवास पूर्ण झाल्यामुळे टीमचे अभिनंदन केले. 

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळखंट पोमण, उपआयुक्त रविकिरण घोडके,  अजय चारठाणकर, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच लाईट हाउसचे युवक, युवती उपस्थित होते.  सुमारे ४००० किलोमीटर प्रवास करून यात्रा आज शहरात दाखल  या यात्रेचा उद्देश हा  युवकांमध्याये ‘उद्योग क्षमता वाढवून त्यांना  स्वयं रोजगारासाठी प्रेरित करणे व त्यासाठीचे अत्यावशक माहिती व तंत्रज्ञान व कौशल्य पुरवणे हा आहे .