खापरे ,शिंदे ,खडसे,भारतीय, दरेकर विजयी

0
279

मुंबई,दि.20(पीसीबी) – विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीतील पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांचा तर महाविकास आघाडीच्या रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे सचिन अहिर यांचा विजय झाला आहे.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण नऊ उमेदवारांचा विजय झाला आहे. पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतासाठी 25.73 चा कोटा ठरवण्यात आला होता. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.

विधानपरिषदेतील विजयी उमेदवार

रामराजे निंबाळकर
एकनाथ खडसे
आमश्या पाडवी
सचिन अहिर
प्रवीण दरेकर
राम शिंदे
श्रीकांत भारतीय
उमा खापरे

पहिल्या फेरीमध्ये भाजपचे चार, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार वेटिंगवर आहेत. काँग्रेसच्या हंडोरे यांना 22 मतं, भाई जगताप यांना 19 तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 17 मतं मिळाली आहे.

रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मत बाद
विधानपरिषदेसाठी पहिल्या टप्प्याची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या राजराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाल्याचं स्पष्ट झालं. या मतावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता.तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद झाले. असं असली तरी हे दोन्ही उमेदवार विजयी झाले.

काँग्रेसची तक्रार आणि मतमोजणीला विलंब
विधान परिषदेसाठी गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. परंतु भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी दुसऱ्याच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसची ही तक्रार फेटाळली.