नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : अग्निपथ योजनेला विरोध होत असताना भारतीय लष्कराने आवश्यक अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नोंदणी जुलैमध्ये सुरू होईल. अधिसूचनेत पात्रता अटी, भरती प्रक्रिया, वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील आहे. जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होईल.
अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांसाठी भरती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन किंवा पदवी मिळणार नाही. याशिवाय सैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या कॅन्टीनची सुविधाही अग्निवीरांना मिळणार नाही. भारतीय लष्कराच्या अधिसूचनेनुसार आठवी आणि दहावी उत्तीर्ण युवकही अर्ज करू शकतात. अग्निवीरांच्या पहिल्या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नोंदणी जुलै महिण्यात सुरू होईल. ८३ भरती मेळाव्यातून सुमारे ४० हजार सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी संकेतस्थळावर भेट द्यावी लागले. जुलैपासून सैन्याच्या विविध भरती युनिट्स स्वत:च्या अधिसूचना जारी करतील. अधिसूचनेनुसार आर्मीमध्ये अग्निवीरांना वर्षभरात ३० सुट्ट्या मिळतील.
अग्निपथ योजनेअंतर्गत भर्ती मेळावे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आयोजित केले जातील. डिसेंबरच्या पहिल्या आणि दुस-या आठवड्यात सुमारे २५,००० भरतीचे प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षणार्थी अग्निवीरांची दुसरी तुकडी २३ फेब्रुवारी २०२३ च्या सुमारास प्रशिक्षण सुरू करेल. सुमारे ४०,००० जवानांच्या निवडीसाठी देशभरात एकूण ८३ भरती मेळावे घेण्यात येणार आहेत.












































