ऐश्वर्य आणि वैराग्य हे तुकोबारायांचे गुण : हभप चैतन्य महाराज देगलूरकर

0
245

तुकाराम महाराज पालखीसाठी आ. अण्णा बनसोडे यांनी दिलेल्या सिंहासनाची मिरवणूक व पूजा

पिंपरी, दि.१८ (पीसीबी ) ऐश्वर्य आणि वैराग्य हे तुकोबारायांचे गुण आहेत. जगद्गुरु संत तुकाराम यांना वडिलोपार्जित ऐश्वर्य मिळाले होते तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांना नजराणा भेट म्हणून पाठवला होता. वडिलोपार्जित ऐश्वर्य आणि प्रत्यक्षात छत्रपतींनी पाठवलेला नजराना नाकारून तुकोबारायांनी वैराग्य पत्करले. तुकोबारायांनी सांगितलेल्या भक्तिमार्गावर गेल्या साडे तीनशे वर्षांपासून लाखोंचा वारकरी सांप्रदाय मार्गक्रमण करीत आहे हे तुकोबारायांचे ऐश्वर्यच आहे. त्यांचे भक्त भाविक आमदार अण्णा बनसोडे आणि पिंपरी चिंचवड मधील भक्तांनी दिलेले चांदीचे सिंहासन, अभिषेक पात्र हे देहू देवस्थान संस्थाने स्वीकारावे असे हभप चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आ. अण्णा बनसोडे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक यांनी चांदीचे सिंहासन, अभिषेक पात्र, मखर व पुजा साहित्य असे एकूण २१ किलो चांदीचे साहित्य तयार करण्यात आले आहे. या सिंहासनाचे पिंपरी चिंचवड मधील भक्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी शनिवारी ( दि.१८ जून) सिंहासनाची मिरवणूक काढून पूजा व इतर धार्मिक कार्यक्रम चिंचवड येथे करण्यात आले. सोमवारी (दि. २० जून) देहू येथे सिंहासन आणि इतर साहित्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देवस्थानला अर्पण करण्यात येणार आहे.

त्यानिमित्त शनिवारी आ. अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर झालेल्या धार्मिक कार्यक्रमात हभप देगलूरकर बोलत होते.

यावेळी आ. आण्णा बनसोडे, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, हभप संतोष महाराज मोरे, हभप माणिक महाराज मोरे, हभप संजय महाराज मोरे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त तसेच हभप रामेश्वर महाराज शास्त्री, हभप जगद्गुरुद्वाराचार्य अमृतनाथ महाराज जोशी, हभप प्रकाश काळे, हभप संतोष आनंद शास्त्री, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप भानुदास महाराज तुपे, हभप पांडुरंग महाराज दातार, हभप शेखर कुटे, हभप मंगलदास महाराज जगताप, हभप अर्जुन महाराज जाधव, हभप उद्धव महाराज कोळपकर, तसेच ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर मंगलाताई कदम, अपर्णाताई डोके, आर. एस. कुमार, योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, विनोद नढे, राहुल भोसले, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रशांत शितोळे, प्रसाद शेट्टी, रोहित काटे, मयूर कलाटे, तुषार हिंगे, शितल शिंदे, जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी, मोहम्मद भाई पानसरे, शैलजा मोरे, राम आधार धारिया, प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, माई काटे, गीता मंचरकर शैलजाताई मोरे, समन्वयक शेखर कुटे, संयोजन समिती सदस्य गुलाब कुटे, सतीश लांडगे, निताताई ढमाले, सिद्धार्थ बनसोडे, निलेश शिंदे, संदीप चिंचवडे, शशी घुले, संजय औसरमल, सुभाष बोरकर, संजय ढमाले, भाऊ कालेकर आदींसह भक्त भाविक उपस्थित होते.

सिंहासनाची सकाळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरापासून आ. अण्णा बनसोडे यांचे नवीन जनसंपर्क कार्यालय, काळभोर नगर, चिंचवड पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. एवढे भजनी मंडळाने संत तुकोबारायांचे अभंग सादर केले.

पंढरपूर देवस्थान चे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, “मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या” “देव इच्छीरज चरणीची माती” म्हणजेच देव सुद्धा वारकऱ्यांची भक्तांची सेवा करण्यास इच्छुक असतो. ज्या तुकोबारायांनी कोट्यावधी भक्त भाविकांना नाम सांप्रदायाचा, सहिष्णुतेचा मार्ग दाखवला त्यांची सेवा करण्याची सद्बुद्धी आ. अण्णा बनसोडे यांना मिळाली अशी सेवा भविष्यातही आ. बनसोडे यांच्या हातून घडो अशी प्रार्थना विठ्ठल चरणी गहिनीनाथ महाराजांनी केली. उपस्थितांचे स्वागत आमदार अण्णा बनसोडे, प्रास्ताविक हभप शेखर महाराज कुटे, सूत्रसंचालन सुरेश गारगोटे, आभार हभप सतीश महाराज गव्हाणे यांनी मानले.